Tuesday, March 25, 2025

Latest Posts

Marathi actress Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी, आता या नावाला आपण सगळेच ओळखून आहोत …सोनालीचा परिचय आपल्याला तिच्या नटरंग या चित्रपटातून झाला..

सोनाली ही आपल्याच पुण्यातील, मराठी अभिनेत्री..

२००९ साली प्रदर्शित झालेल्या नटरंग या चित्रपटाने सोनालीला मराठी अभिनेत्रीची ओळख मिळवून दिली..या चित्रपटातील ‘अप्सरा आली’  या गाण्यावरील सोनालीच्या नृत्याची अनेकांनी प्रशंसा केली..

सोनालीचा जन्म १८ मे १९८८ ल पुण्यात झाला… सोनालीचे वडील हे मराठी आहेत तर आई पंजाबी..

सोनालीने २००५ साली पुणे क्वीन हा पुरस्कार मिळवला, त्या नंतर तिने काही प्रिंट जाहिरातीन मध्ये सुद्धा काम केले..

Mass Communication And Journalism मध्ये सोनालीने पदवी मिळवली आहे..

सोनालीने इ टीव्ही मराठी वरील ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले… हा खेळ संचिताचा मालिकेचे काम सुरू असतानाच सोनालीला तिचा पहिला चिटपट ‘गाढवाचे लग्न’ मिळाला..

या नंतर केदार शिंदेंनी, सोनालीला त्यांच्या ‘बकुळा नामदेव गोखले’ या चित्रपटा मध्ये संधि दिली.

पण सोनालीला मराठी चित्रपट सृष्टीमद्धे मानाचे स्थान मिळवून दिले ते….’नटरंग’ या चित्रपटाने…

नटरंग नंतर सोनालीने अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये अभिनय केला…

जसे की…क्षणभर विश्रांति, इरादा पक्का, अजिंठा, समुद्र..

या सर्व चित्रपटामधून सोनालीने स्वतची अशी एक वेगळीच छाप सोडली..

Latest Posts

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.