Saturday, March 30, 2024
More

  Latest Posts

  हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनित “फायटर” चित्रपटाने पहिल्या आठवड्याड केली इतक्या कोटींची कमाई. – ‘Fighter’ Week 1 box office collection

  ‘Fighter’ Week 1 box office collection

  ह्रितिक रोशन , दीपिका पदुकोन, अनिल कपूर, करन ग्रोवर, आशुतोष राणा अशी तगडी स्टार मंडळी असलेला फायटर चित्रपट २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या मोठया सुट्टीच्या आठवड्यात प्रदर्शित झाला. हा चित्रपट पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान वर केलेल्या हवाई हल्ल्यावर आधारित एक काल्पनिक चित्रपट आहे. अपेक्षे प्रमाणेच पहिल्याच दिवशी चित्रपटाने २२ करोड रुपयांची कमाई केली, जी शाहरुख खान च्या “dunky” या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाई पेक्षा कमीच होती. तरी सुद्धा चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ जानेवारीला ३९ करोड ची जबरदस्त कमाई केली. पण फक्त याच दिवशी चित्रपट ३० कोटींपेक्षा जास्त कमाई करू शकला.

  पहिल्या ४ दिवसात १०० कोटींची कमाई केल्यानंतर चित्रपट पुढील ४ दिवसात अधिक कमाई करण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरला. रविवारी २९ करोड कमाई केल्यावर सोमवारी फक्त ८ करोड आणि संपूर्ण आठवड्यात फक्त १४० करोड कमाई चित्रपटाने केली.

  मोठे कलाकार असलेल्या “FIGHTER” चित्रपटाने पहिल्या आठवड्यात कमीत कमी २०० कोटी कमावणे अपेक्षित होते. पण हे झाले भारतातील कमाईचे आकडे.

  “FIGHTER” चित्रपट हा परदेशात चांगली कमाई करत आहे, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये चित्रपटाने चांगली कमाई केली आहे . अंदाजा प्रमाणे चित्रपट हा ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई करू शकेल.

  ह्रितिक रोशन , दीपिका पदुकोन यांचा फायटर हा चित्रपट आपण पाहिलात का? आपल्याला चित्रपट आवडला का? खाली कंमेंट करून सांगा.

  Latest Posts

  Don't Miss

  Stay in touch

  To be updated with all the latest news, offers and special announcements.