Sunday, March 31, 2024
More

  Latest Posts

  Maharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज

  लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज झाला.

  Maharashtra Shahir Teaser

  Maharashtra Shahir Teaser: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते रिलीज झाला. यावेळी राज ठाकरे यांनी शाहीर साबळे यांच्या आठवणींना उजाळा दिला. “बाळासाहेबांना ‘बाळ’ अशी हाक मारणाऱ्या लोकांपैकी एक शाहीर होते. शाहीरांचा प्रवास हा स्वातंत्र चळवळीपासून ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंत असा आहे. जेव्हा मला केदारनं चित्रपटाबद्दल सांगितलं तेव्हा मला धाकधूक होती. मी त्याला प्रश्न विचारला की, शाहीरांचे काम कोण करणार? तर त्याने अंकुश चौधरी उत्तर दिलं. तो शाहीरांसारखा दिसेल का? असा प्रश्न मी त्याला विचारला. तर त्याने मला सांगितलं, तो त्यांच्या भूमिकेत शिरेल. मी आज चित्रपटाचा टीझर पाहिला. मला दिसलं की, अंकुश हा खरंच भूमिकेत शिरला आहेस.”

  महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या टीझरमध्ये अंकुश चौधरी (Ankush Choudhary) हा शाहीर साबळे यांच्या भूमिकेत दिसत आहे. टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण यांची भूमिका साकारलेले कलाकार देखील दिसत आहेत. आता प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

  महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. तर या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी केली आहे. या चित्रपटात अंकुशसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
  अजय-अतुल यांनी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटामधील गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  Latest Posts

  Don't Miss

  Stay in touch

  To be updated with all the latest news, offers and special announcements.