Friday, March 29, 2024
More

  Latest Posts

  Marathi TV Serial – Chandra Aahe Sakshila Completed 100 episodes – चंद्र आहे साक्षीला मालिकेचे १०० भाग पुर्ण.

  नुकतेच “चंद्र आहे साक्षीला” या कलर्स मराठीवरील मालिकेने १०० भाग पूर्ण केले. त्या निमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टीम ने केलेल्या पार्टी ची माहिती लेखक-निर्माते चिन्मय मांडलेकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्ट मधून दिली.

  Chandra-Aahe-Sakshila

  Marathi TV Serial – Chandra Aahe Sakshila Completed 100 episodes – चंद्र आहे साक्षीला मालिकेचे १०० भाग पुर्ण.

  लॉकडाऊन सम्पल्यानंतर आलेल्या नवीन मालिकां पैकी कलर्स मराठीवरील “चंद्र आहे साक्षीला” हि एक मुख्य मालिका. नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या मालिकेत सुबोध भावे, ऋतुजा बागवे मुख्य भूमिकेत आहेत. चिन्मय मांडलेकर आणि दिगपाल लांजेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. सुरुवातीपासूनच “चंद्र आहे साक्षीला” मालिकेला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले, त्यामुळेच मालिकेचे १०० भाग नुकतेच पूर्ण झाले.

  त्या निमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टीम ने केलेल्या पार्टीचे काही फोटो चिन्मय मांडलेकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्ट मधून शेअर केले. पोस्ट मधून त्यांनी संपूर्ण मालिकेच्या टीमचे, कलर्स मराठीचे आणि मायबाप प्रेक्षकांचे आभार मानले. या पार्टीमध्ये मालिकेच्या पोस्टर चा केक कापून संपूर्ण टीम ने आनंद साजरा केला.

  नुकताच या मालिकेचा भाग झालेला अभिनेता आस्ताद काळे सुद्धा आपल्याला या फोटोमध्ये दिसतो. आस्ताद ने या मालिकेत संग्राम जगताप नावाचे पात्र साकारले आहे. ही मालिका आपण कलर्स मराठीवर रात्री ८:३० ला तर वुट अँपवर कधीही पाहू शकता.

  नेहमीच्या विषयांपेक्षा वेगळा विषय असलेली “चंद्र आहे साक्षीला” हि मालिका असेच पुढील १००० भाग पूर्ण करो,हि सदिच्छा..

  Latest Posts

  Don't Miss

  Stay in touch

  To be updated with all the latest news, offers and special announcements.