

Planet Marathi – Marathi OTT Platform – लवकरच येतेय नवीन मराठी वेब सिरीज
अक्षय बर्दापूरकर यांनी २०१७ मध्ये प्लॅनेट मराठी या फक्त मराठी भाषेतील मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. सध्या ऍमेझॉन प्राईम, हॉटस्टार, नेटफ्लिक्स, झी ५, सोनी लिव, वुट, अल्ट बालाजी असे अनेक ओटीटी प्लँटफॉर्म आहेत. यातील बर्याचश्या प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेतील मनोरंजन उपलब्ध आहे. पण फक्त मराठी मनोरंजनासाठी स्वतंत्र व्यासपीठ म्हणून प्लॅनेट मराठीची सुरुवात करण्यात आली.
प्लॅनेट मराठीच्या माध्यमातून मराठी चित्रपट, मराठी मालिका, मराठी वेबसिरीज यांना व्यासपीठ तर मिळणार आहेच पण सोबतच मराठी रसिकांना सुद्धा एकाच ठिकाणी दर्जेदार मराठी मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
नुकतेच प्लॅनेट मराठी प्लँटफॉर्मने त्यांच्या पहिल्या मराठी वेब सिरीजच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या मालिकेचे नाव अद्याप माहित नसले तरी या मालिकेत मृण्मयी देशपांडे, शशांक केतकर आणि अभिजीत खांडकेकर या कलाकारांची मुख्य भूमिका असून, अभिनेते आनंद इंगळे सुद्धा यात छोट्या भूमिकेत दिसणार आहेत. विप्लव एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली या मालिकेची निर्मिती संतोष गुजराथी यांनी केली असून दिग्दर्शक मयुरेश जोशी आहेत.


वेब सिरीज चे नाव अजूनही जाहीर झाले नसले तरी हि एक प्रेमकथा असणार आहे आणि हि वेब सिरीज फक्त प्लॅनेट मराठी याच ओटीटी प्लॅटफॉर्म वर उपलब्ध असणार आहे.
प्लॅनेट मराठीच्या या नव्या कोऱ्या मराठी वेबसिरीज साठी हलतीचित्रे.कॉम टीम कडून शुभेच्छा.