Thursday, June 8, 2023
More

    Latest Posts

    Marathi Movie Circuit – मराठी चित्रपट सर्किट

    Marathi Movie Circuit रितेश देशमुख(Rithesh Deshmukh) आणि जेनेलिया(Jenelia) च्या वेड चित्रपटाने मराठी प्रेक्षकांना वेड लावले असतानाच, वैभव तत्ववादी(Vaibhav...

    Maharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज

    लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट आधारित आहे....

    OTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)

    नेटफ्लिक्स आणि इतर OTT प्लॅटफॉर्मवर येणार्‍या नवीन चित्रपट आणि वेब शोची यादी, जी रॉकेट बॉईज सीझन 2, कुट्टे ते पॉप कौन पर्यंत...

    …आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला!

    ….भारतकुमार राऊत

    आजपासून बरोबर 86 वर्षांपूर्वी 1931 साली भारतीय चित्रपटाला कंठ फुटला आणि तो हिंदी/उर्दूत बोलू लागला. अर्देशर इराणी यांनी दिग्दर्शित केलेला पहिला भारतीय बोलपट, ‘आलम आरा’ मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि `बोलणारा, गाणारा सिनेमा’ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली. अखेर गर्दी आवरण्यासाठी चित्रपटगृहावर पोलिसांना पाचारण करावे लागले. इंपिरियल मुव्हीटोन या कंपनीने हा चित्रपट निर्माण केला.

    alam-ara-first-hindi-movie

    त्यानंतर वर्षभरातच, 1932 साली पहिला मराठी बोलपट, ‘अयोध्येचा राजा’ प्रदर्शित झाला. दादासाहेब फाळके यांनी पहिला भारतीय चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ 1913 साली निर्माण केल्यानंतर अवघ्या 18 वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत ही दुसरी क्रांती झाली.

    ‘आलम आरा’ या बोलपटात मास्टर विठ्ठल व पृथ्वीराज कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. आलम आराच्या भूमिकेत झुबिदा ही रुपवान व गोड गळ्याची अभिनेत्री होती. या चित्रपटातील `दे दो खुदा के नाम’ हे फकिरांवर चितारलेले गीत खूप लोकप्रिय झाले होते. ते व्रजर महम्मद खान यांनी गायले.

    दुर्दैवाने `आलम आरा’ या चित्रपटाची एकही प्रिंट आज उपलब्ध नाही.

    alam-ara-first-hindi-movie

    1965 नंतर ती कुणी पाहिली नाही, असे म्हटले जाते. पुण्यातील फिल्म अर्काइव्हला 2003 मध्ये लागलेल्या आगीत ही प्रिंट जळाली, असे म्हटले जात होते. पण त्याचा इन्कार अर्काइव्हचे संस्थापक, संचालक आर के नायर यांनी केला. ‘आलम आरा’ची प्रिंट अर्काइव्हजकडे केव्हाही नव्हतीच असे त्यांनी स्पष्ट केले.

    भारतीय चित्रपटाला बोलायला शिकवणारा चित्रपट आज उपलब्ध नाही, हे दुर्दैव. पण ‘आलम आरा’ने एक गौरवशाली इतिहास रचला, हे मात्र खरे!-

    ….भारतकुमार राऊत

    Latest Posts

    Marathi Movie Circuit – मराठी चित्रपट सर्किट

    Marathi Movie Circuit रितेश देशमुख(Rithesh Deshmukh) आणि जेनेलिया(Jenelia) च्या वेड चित्रपटाने मराठी प्रेक्षकांना वेड लावले असतानाच, वैभव तत्ववादी(Vaibhav...

    Maharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज

    लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट आधारित आहे....

    OTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)

    नेटफ्लिक्स आणि इतर OTT प्लॅटफॉर्मवर येणार्‍या नवीन चित्रपट आणि वेब शोची यादी, जी रॉकेट बॉईज सीझन 2, कुट्टे ते पॉप कौन पर्यंत...

    Don't Miss

    200 Halla Ho Movie Review in Marathi – २०० हल्ला हो

    नागपूरच्या कस्तुरबानगर मधील जिल्हा कोर्टात अक्कू यादव नावाच्या एका आरोपीला आणले जाते. त्या दिवशी कोर्टात नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते आणि त्यातही स्त्रियांचे...

    Dial 100 Movie Review in Marathi- डायल १०० चित्रपट परीक्षण

    डायल १०० चित्रपट परीक्षण Dial 100 Movie Review in Marathi रेन्सील...

    Stay in touch

    To be updated with all the latest news, offers and special announcements.