Marathi Actor – Suyash Tilak – सुयश टिळक
सुयशची झी मराठी वरील “का रे दुरावा” हि मालिका खूप गजाली होती. या मालिकेतील सुयश आणि सुरीची अडारकर या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंद केले होते.
आज जाणून घेणार आहोत सुयश विषयी काही रंजक माहिती.
सुयशचा जन्म १० जानेवारी १९८७ ला पुण्यात झाला, त्याचे प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणपण पुण्यातच झाले. त्याने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले.
सुयश टिळक ने आत्तापर्यंत अनेक मराठी मालिका, चित्रपट आणि नाटक याच बरोबर काही मराठी वेब सिरीज मध्ये सुद्धा काम केले आहे. मागील वर्षी आलेल्या “खाली पिली” या हिंदी चित्रपटात सुद्धा सुयश ने काम केले आहे.
२०११ मध्ये त्याने झी माथी वरील “अमरप्रेम” या मालिकेतून हलत्याचित्रांच्या दुनियेत प्रवेश केला.
या नंतर सुयश ने स्टार प्रवाह वरील “पुढचं पाऊल”, “बंध रेशमाचे”, “दुर्वा”, “छोटी मालकीण” तर झी युवा वरील “बाप माणूस”, “एक घर मंतरलेल” कलर्स मराठी वरील “सख्या रे” आणि सध्या चालू असलेल्या “ऑनलाईन शुभमंगल” या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या.
मराठी मालिकांमध्ये काम करत असतानाच सुयश मराठी चित्रपटांसाठीसुद्धा चित्रीकरण करत होता. त्याचे आत्तापर्यंत “तीचा उंबरठा”, “क्लासमेट्स”, “कॉफी आणि बरेच काही”, “भाखरखाडी ७ किमी” हे चित्रपट परर्षित झाले आहेत.
तर स्ट्रॉबेरी हे सुयश चे नाटक खूप गाजले, त्याने “शॉक कथा” या मराठी वेब सिरीज मध्ये सुद्धा काम केलं आहे.
सुयश च्या पुढच्या वाटचालीसाठी हलतीचित्रे.कॉम कडून शुभेच्छा.