JL५० – वेब सिरीज चे नाव म्हणजे एका विमानाचा नंबर आहे. वेब सिरीज ची कथा सुरु होते तेव्हा एका विमानाचे अपहरण झालेले असते आणि एका ठिकाणी विमान अपघाताची बातमी असते. अभय देओल जो या चित्रपटात CBI अधिकाऱ्याची भूमिका करत आहे त्याच्याकडे या विमान अपघाताची चौकशी करण्याचे काम येते. अभय देओल म्हणजेच शंतनू याला या चौकशीत काही रस नसतो. पण जेव्हा त्याला समजते ज्या विमाचा अपघात झालाय ते विमान कलकत्ता विमानतळावरून ३५ वर्षांपूर्वी उडाले होते तेव्हा खऱ्या गोष्टीला सुरुवात होते.
JL५० या वेब सिरीज चे दिग्दर्शन शैलेंद्र व्यास यांनी केले आहे. कथा सुद्धा त्यांचीच आहे. व्हिजन २० एंटरटेनमेंट, गोल्डन रेशो फिल्म्स आणि फ्लायिंग ड्रॅगन एंटरटेनमेंट या बॅनर खाली या मालिकेची निर्मिती झाली. या मालिकेत ३०-४० मिनिटांचे एकूण ४ भाग आहेत. जवळ जवळ १४० मिनिटांची हि संपूर्ण मालिका आहे.
JL५० या मालिकेत अभय देओल(शंतनू), पंकज कपूर(प्रोफेसर सुब्रतो दास), राजेश शर्मा(गौरांगो), पियुष मिश्रा(प्रोफेसर बिस्वजीत मित्रा) आणि रितिका आनंद(बिहू घोष) यांच्या मुख्य भूमिका आहेत.
आत्ता पर्यंत तूम्हाला कळलेच असेल हि मालिका एक रहस्यमय थरार आहे. असे विमान जे ३५ वर्षांपूर्वी उडाले त्याचा ३५ वर्षांनी अपघात कसा होऊ शकतो. हाच गोंधळ CBI अधिकारी शंतनू याचा सुद्धा होता. विमानात मिळालेल्या सर्व गोष्टी प्रवाशांची कागदपत्रे ३५ वर्षांपूर्वीचीच असतात. त्यामुळे या विमानाने टाइम ट्रॅव्हल केला अशी शंका येऊ लागते. पण शंतनूला कायम वाटत असते याला टाइम ट्रॅव्हल दाखवण्याचा प्रयत्न होतोय. या विमान अपघातातून २ व्यक्ती वाचतात ज्यातील एक विमानाची वैमानिक असते. पुढे शंतनू त्यांची चौकशी करतो आणि खरी घटना उलगडायला लागते.
आता हे खरंच टाइम ट्रॅव्हल होते का कि कोणी मुद्दामून ते तसे दाखवण्याचा प्रयत्न करत होते आणि जर हे टाइम ट्रॅव्हल होते तर ते कोणी आणि का केले. अश्या अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी JL५० हि मालिका सोनी लिव वर पहा.
मालिकेचा विषय हा पॅन अमेरिका फ्लाईट ९१४ किंवा स्यांटीयागो फ्लाईट ५१३ वरून घेण्यात आला असावा, या दोन्ही फ्लाईट विषयी अशीच गोष्ट सांगितली जाते. दोन्ही फ्लाईट चा अपघातच झाला पण ३७ आणि ३५ वर्षांनंतर. या रहस्याचा शोध अजूनही कोणीच घेऊ शकले नाही. इंटरनेट वर यावर आधारित अनेक लेख किंवा डॉक्युमेंट्री उपलब्ध आहेत. अधिक कुतूहल असेल तर नक्की पहा.
JL५० मालिकेतली सर्व कलाकारांचे अभिनय उत्तमच आहेत. पात्रांची निवड, सिनेमॅटोग्राफी , संवाद, लोकेशन्स सगळे मस्त जमून आले आहे. VFX किंवा ग्राफिक्स अजून चांगले करत आले असते पण कदाचित मर्यादित बजेटमुळे त्यावर जास्त काम झाले नाही.
थोडक्यात टाइम ट्रॅव्हलचा रहस्यमयी थरार अनुभवायचा असेल तर हि मालिका नक्की पहा.