Author – Vivek Kulkarni
Michelle Yeoh
कुठलीही मार्शल आर्ट्सची पार्श्वभूमी नसताना निव्वळ सिनेमात काम करायचय या उद्देशाने उद्योगात आलेल्या मिशेलला ( Michelle Yeoh ) तिसऱ्याच सिनेमात लीड रोल मिळाला. ‘येस मॅडम’मध्ये (१९८५) तिच्यासोबत होती अमेरिकेतून आलेली मार्शल आर्टस् निपुण सिंथिया रॉथरॉक. सिनेमात तिने कुठेही जाणवू दिलं नाही की ती सिंथियापेक्षा कमी आहे म्हणून.
पुढे ‘विंग चून’ व इतर मार्शल आर्ट्स सिनेमात कामे केल्यावर आणि स्टारडम मिळाल्यावर तिने गंभीर भूमिका करायला सुरूवात केली. ‘मेमवॉर्स ऑफ अ गेयशा’, आंग सान सु की वरील बायोपिक ‘द लेडी’ असेल स्वतःला निव्वळ अॅक्शन स्टारच्या पलीकडे जाणून परिपूर्ण अभिनेत्री होण्याचा प्रयत्न तिचा दिसून येतो. पण तिचे ८०-९० च्या दशकातील अॅक्शन फिल्म्सच जास्त लक्षात राहतात.
आज मिशेल योचा वाढदिवस. हार्दिक शुभेच्छा डिअर.
#michelleyeoh #martialartscinema
Books written by Author – Vivek Kulkarni
लातूर पॅटर्न – Kindle
लातूर पॅटर्न – PaperBack
माधवराव एकंबीकर – Kindle
अनरउबीक – Kindle