अभिनेते किशोर नांदलस्कर(Kishore Nandalaskar) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
किशोर नांदलस्कर यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट, नाटके आणि मालिकांमध्ये अभिनय केला आहे.
महेश मांजरेकर यांच्या “वास्तव” चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. यानंतर त्यांनी “जान जाये पर वचन ना जाये”, “जिस देश मै गंगा रेहता हैं”, “खाखी “, “सिंघम”, “हलचल” अश्या अनेक हिंदी चित्रपटांमद्ये मुख्यत्वे विनोदी भूमिका केल्या. सिंघम मधील त्यांची भूमिका खूपच छोटी पण प्रभावी होती.
त्यांनी १९८९ मध्ये इना मीना डिका या मराठी चित्रपटातून चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. मराठीमद्ये एक उत्तम चरित्र कलाकार म्हणून ते ओळखले जातात. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्या सोबत त्यांनी ९० च्या दशकात अनेक चित्रपट केले. “थरथराट”, “हमाल दे धमाल”, “चंबू गबाळे”, “धमाल बाबल्या गणप्याची”, “शेजारी शेजारी “, “शेम तो शेम”, “लोणावळा बायपास”,”गोष्ट लग्नानंतरची” अश्या अनेक चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या.
चित्रपटांसोबतच अनेक मालिका आणि नाटकांमद्ये त्यांनी काम केले, “श्रीमान श्रीमती”, “वन रुम किचन “, “पाहुणा “, “वासूची सासू”, “विच्छा माझी पुरी करा”, “नाना करते प्यार” अश्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या.