Aastad Kale Wiki – Biography – आस्ताद काळे
अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये आस्ताद ने काम केले आहे, मराठी बिगबॉस आणि सिंगिंग स्टार या रिऍलिटी शो मध्ये सुद्धा त्याने सहभाग घेतला होता. जाणून घेऊया आस्ताद विषयी अधिक माहिती.
आस्ताद चा जन्म १६ मे १९८३ ला पुण्यामध्ये झाला. त्याचे शालेय शिक्षण पुण्यामधील सेठ दगडूराम कटारिया या शाळेत झाले तर त्याने फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढे अभिनेता होण्यासाठी आस्ताद पुण्याहून मुंबईला गेला.
आस्तादला लहानपणापासूनच अभिनय आणि गाण्याची आवड होती. वयाच्या चौथ्या वर्षांपासून त्याने शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्याने अनेक संगीत नाटकांमध्ये सुद्धा भूमिका केल्या आहेत. जसे कि परेश मोकाशी दिग्दर्शित “संगीत लग्न कल्लोळ” , “काहे कबीर“, “प्रोपोजल” तर “मिस्टर अँड मिसेस लांडगे” या विनोदी नाटकात सुद्धा त्याने महत्वाची भूमिका केली तसेच मागच्या वर्षीच झी मराठीच्या “तिला काही सांगायचंय” या नाटकात आस्तादने तेजस्विनी प्रधान सोबत मुख्य भूमिका साकारली. सोबतच आस्तादने “पुढचे पाऊल“, “ऊन पाऊस“, “असंभव“, “अग्निहोत्र“, “वादळवाट“, “सरस्वती” तर सध्या सुरु असलेली “चंद्र आहे साक्षीला” अश्या अनेक मराठी मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या.
आस्तादच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित फर्जंद, फत्तेशीकस्त या दोन्ही चित्रपटांमध्ये तो होता. तर पुढील येणाऱ्या जंग जौहर म्हणजेच पावनखिंड यामध्ये सुद्धा आस्ताद असणार आहे. “प्लॅटफॉर्म” या चित्रपटात आस्तादने मुख्यभूमीक केली तर “लग्न मुबारक“, “निर्दोष“, “निवडुंग“, “निरोप” , “दमलेल्या बाबाची कहाणी“, या चित्रपटांमध्ये सुद्धा त्याने महत्वाच्या भूमिका केल्या.