बेलबॉटम चित्रपट ट्रेलर परीक्षण
BellBottom Movie Trailer Review
लोकडाऊन मधील मागील दिड वर्षा नंतर पहिल्यांदा एक मोठ्या बॅनरचा हिंदी चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मुख्य म्हणजे कालच महाराष्ट्रातील काही निर्बंध शिथिल करण्यात आले पण तरीही चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे बंदच राहणार आहेत. आणि तरीही बेलबॉटम चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपट महाराष्ट्र सोडून बाहेर चित्रपटगृहातच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. बेलबॉटम चित्रपट १९ ऑगस्ट २०२१ ला प्रदर्शित होणार आहे.
BellBottom Movie Releasing on 19th August on Big Screens
बेलबॉटम चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमीकेत आहे तर त्याच्या सोबत वाणी कपूर, हुमा कुरेशी, आदिल हुसेन असे कलाकार असणार आहेत. चित्रपट हा १९८४ मधील विमान अपहरणावर आधारित आहे. ट्रेलर वरून अक्षय कुमारची भूमिका हे बेबी चित्रपटातील भूमिकेशी मिळती जुळती भासते. चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका अभिनेत्री लारा दत्ता साकारत आहे. ट्रेलर मध्ये तुम्ही लाराला ओळखू पण शकत नाही.
Lara Datta as Indira Gandhi in BellBottom Movie
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या महाराणी या वेबमालिके नंतर हुमा कुरेशी बेलबॉटम मध्ये दिसणार आहे. या पूर्वी जॉली LLB २ मध्ये सुद्धा अक्षय आणि हुमा ने एकत्र काम केलेले. वाणी कपूर हि अक्षयच्या प्रियसीच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचा विषय पाहता तिची भूमिका हि एखाद्या गाण्या पुरती आणि काही छोट्या संवांदांपुरती मर्यादित असेल असेच वाटते. आदिल हुसेन हे देखील चित्रपटात एका मुख्य भूमीकेत आहेत. त्यांच्या नेहमीच्या नैसर्गिक अभिनयामुळे चित्रपट १ पायरी वर नक्कीच जाणार. चित्रपटाचे दिग्दर्शन रणजित तेवारी यांनी केले आहे.
बेलबॉटम हे चित्रपटाचे नाव चित्रपटातील अक्षय कुमारच्या भूमिकेचं कोड नाव आहे. त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या बेलबॉटम पॅन्टचा संदर्भ असावा असे ट्रेलर वरून दिसते.
चित्रपटातील संवाद हे हेर कथेवर आधारित चित्रपटात असतात तसेच larger than life आहेत. पण कधी कधी हेच संवाद आपले मनोरंजन करतात. आता हे संवाद, ऍक्शन आणि थरार आपले मनोरंजन करण्यात कितपत यशस्वी होतात हे १९ ऑगस्टलाच समजेल.
तो पर्यंत चित्रपटाचा ट्रेलर अजून पहिला नसेल तर खाली पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंट करून द्या.