नेटफ्लिक्स आणि इतर OTT प्लॅटफॉर्मवर येणार्या नवीन चित्रपट आणि वेब शोची यादी, जी रॉकेट बॉईज सीझन 2, कुट्टे ते पॉप कौन पर्यंत आहेत. या शुक्रवारी OTT सेवांवर पदार्पण होत असलेल्या मनोरंजक नवीन चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी, खाली स्क्रोल करा.
Best OTT Shows / Movies released on 17th March 2023
1. Rocket Boys – 2 | रॉकेट बॉईज 2
पहिल्या सिझनच्या यशानंतर , रॉकेट बॉईजचा बहुप्रतिक्षित दुसरा सीझन शेवटी SonyLIV वर स्ट्रीम झाला. कलाकार – डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या भूमिकेत जिम सरभ आणि डॉ. विक्रम अंबालाल साराभाईच्या भूमिकेत इश्वाक सिंग पुन्हा एकदा आपली मने जिंकण्यासाठी परतत आहेत! Rocket Boys Season 2 | रॉकेट बॉईज सीझन 2 रिलीज तारीख: मार्च 16, 2023 Rocket Boys Season 2 | रॉकेट बॉईज सीझन 2 कुठे पहायचे?: सोनी लिव्ह
2. Kuttey | कुत्ते
क्राइम ऍक्शन थ्रिलरनि भरपूर हा चित्रपट एका ATM वॅन च्या भोवती फिरतो ज्यात ३ ते ४ करोड कॅश असते. अर्थातच या कॅशवर नजर ठेवून एक गट हि वॅन लुटायचा प्लॅन बनवतो त्यासाठी काहीही करण्याची या गटाची तयारी असते. पण तेव्हाच इतर काही गट सुद्धा अश्याच प्रकारचा प्लॅन बनवत असतात. पण कोणता गट कोणावर भारी पडणार , एवढी मोठी कॅश कोणाच्या हाती लागणार आणि हि पैशांची हवस कोणाच्या पतनास कारणीभूत ठरणार. हे सर्व जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नेटफ्लिक्स वर पहा.
तब्बू, कोंकणा सेन शर्मा आणि नसीरुद्दीन शाह यांसारख्या प्रतिभावान स्टारकास्टसह, हा चित्रपट या वीकेंडसाठी खूप चांगला आहे.
कुत्ते ओटीटी प्रकाशन तारीख: मार्च १७, २०२३ |
कुत्ते कुठे पाहायचा : नेटफ्लिक्स
3. Vaathi । वाथी
धनुषचा नवीन चित्रपट “वाथी” एका महाविद्यालयीन प्राध्यापकाभोवती फिरतो जो देशातील शिक्षणाच्या खाजगीकरणाविरुद्ध लढतो. हा चित्रपट तुम्हाला नक्कीच प्रभावित करेल.
Vaathi । वाथी कुठे पहाल ? नेटफ्लिक्स
4. Pop Kaun । पॉप कौन
कुणाल खेमू, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक, जॉनी लीव्हर, सौरभ शुक्ला, अश्विनी काळसेकर, चंकी पांडे आणि राजपाल यादव यांची प्रमुख भूमिका असलेला पॉप कौन हि मालिका हसण्याचा दंगा आहे! मालिकेचे मुख्य पात्र साहिल (कुणाल खेमु) याला मालिकेच्या पहिल्याच भागात कळते ज्यांना तो इतकी वर्षे स्वतःचे वडील समजत होता ते त्याचे वडील नाहीत आणि मग सुरुवात होते ती खऱ्या वडिलांना शोधायची. डोके बाजूला ठेऊन निव्वळ हसायचे असेल तर हि मालिका एक उत्तम पर्याय आहे.
Pop Kaun । पॉप कौन – डिस्ने + हॉटस्टार