Wednesday, January 31, 2024
More

    Latest Posts

    The Kashmir Files – द काश्मीर फाइल्स

    The Kashmir Files – Real Review By FilmiRaje on HaltiChitre.com

    लेखक – रोहनराजे जाधवराव

    The Kashmir Files Review – द काश्मीर फाइल्स

    कालच एका नाट्य आणि सिनेमा वेड्या संस्थेने (नाव न सांगण्याच्या अटीवर [“याचे कारण मला हि कळले नाही”]) “The kashmir files” सिनेमाचे तिकीट पाठवले… खरेतर झुंड आणि हा सिनेमा मी पाहणारच नव्हतो… कारण उगाच राजकीय वाद निर्माण होणारे सिनेमे मला आवडत नाहीत… कारण आपण ते पाहणार त्यावर काही तरी लिहण्याचा मोह नाही आवरणार.. आणि मग आपण लिहिले कि त्यावर काही लोक उड्या मारत नको नको त्या कमेंट द्यायला येणार… म्हणून जोर ओसरला कि असे सिनेमे मी पाहतो… पण विनंतीला मान देऊन हा सिनेमा पाहावा लागला…

    चित्रपटाच्या सुरवातीलाच हा सिनेमा हिंदू-मुस्लिम यांच्यावर नसून प्रकृती विरुद्ध विकृती यावर आहे हे दाखवले आहे… जिथे अब्दुल नावाचा मुलगा शिवा नावाच्या मुलाला काही काश्मिरी (पण स्वतःला भारतीय न समजणाऱ्या) मुलांच्या घोळक्यातून सोडवतो… हा सिनेमा तुम्हाला कुठेच हिंदू-मुस्लिम vibe देत नाही (हा, जर तुम्ही आवर्जून त्याच नरजेने हा सिनेमा बघत असाल तर काही पर्याय नाही) हेच सर्व जगभर झालेले आहे… ज्यू विरुद्ध यहुदी… पर्शियन (आत्ताचे पारसी) लोकांना मूळ देशातून हाकलून काढले, कित्येक मूळ इराणी लोक हाकलले गेले.. गोव्यातून पोर्तुगीजांनी धर्म बदल अथवा गोवा सोडा दिलेले फरमान… सिंध प्रांतातून पंजाबी आणि सिंधी हाकलले गेले, बांगलादेश मधून कित्येक मुस्लिम लोकांनाच पाकिस्तानी लोकांनी सळो कि पळो करून सोडले होते किंवा सध्या सध्या युक्रेन मधून युद्ध करून तिथली माणसे हाकलले जात आहेत.. अश्या सर्वांचा हा सिनेमा आहे… या सिनेमात काय बघाल आणि का बघाल हे आपले आपण ठरवायचे… कोण चूक कोण बरोबर यावर काही भाष्य करायचे नाही… पण आतंकवाद ज्यांच्या मनात आहे ते लोक लहान लहान मुलांचे कसे ब्रेन वॉश करतात हे फारच अस्वस्थ करते…हे ठिकाण केवळ सिनेमा बद्दल बोलण्यासाठी आहे.. तर सिनेमातील मला आवडलेल्या काही गोष्टी…

    १) दर्शन कुमार हा अभिनेता… अहाहा काय काम करतो मागे जेव्हा family man सिरीज बद्दल लिहिले होते तेव्हा सुद्धा याचे कौतुक केले होतेच.. पण या सिनेमात हा अभिनेता फारच उठून दिसलाय.. त्याचा एक सिन आहे.. खूप खूप खूपच छान दाखवलाय.. दर्शन म्हणजे कृष्णा याचे आई वडील आणि भाऊ याच्या लहानपणीच वारलेत… त्याने कधी साधा त्यांचा फोटो सुद्धा पहिला नाही… तो त्याच्या आजोबांच्या (अनुपम खेर) मित्राच्या घरी राहतोय तिथे तो मित्राच्या बायकोला विचारतो,” ऑंटी आपके पास मेरे पेरेंट्स कि कोई फोटो है” त्यावर त्या ऑंटी (मृणाल कुलकर्णी) बोलतात “हा महाशिवरात्री को हम एक ग्रुप फोटो लेते थे” आणि ती एका ग्रुप फोटो कडे बोट दाखवते भरल्या डोळ्याने कृष्णा तो फोटो पाहतो थोडा वेळ आणि ऑंटी कडे वळून बोलतो “ऑंटी इनमे से मेरे माता पिता कौन है?” हा प्रश्न जसा तिथे उपस्थित प्रत्येकाच्या काळजात घुसतो तसाच तो चित्रपट बघणाऱ्यांच्या पण काळजात खोल वर रुतत जातो….

    २) मिथुन चक्रवर्तीच्या तोंडी काही अप्रतिम संवाद दिलेत ज्यातून त्याची घुसमट अचूक टिपली आहे आणि त्यातलाच एक म्हणजे जेव्हा कृष्णा विचारतो कि “हमारे साथ इतना हुआ तो उन्होने मुझे बताया क्यू नहीं” यावर ब्रम्ह दत्त (मिथुन) इतकेच म्हणतो “तुटे हुए लोग बताते नहीं, उन्हे सिर्फ सुना जाता है..” हे वाक्य आजच्या कित्येक मुलांना लागू पडते ज्यांना आपल्या आईवडिलांच्या कित्येक गोष्टी कळत नाहीत… कारण ते काही बोलत नाहीत…

    ३) यातील “धर्म बदला किंवा मरा किंवा पळून जा” यापेक्षा “make kashmir pakistan, without hindu man but with hindu Woman” आणि वरती म्हटल्याप्रमाणे धर्म नाही तर हि विकृती जन्माला येत होती… ज्यात कित्येक लोक हिंदूंच्या नावाखाली ख्रिश्चन, बौद्ध, इतर दलित आणि मुस्लिम यांचे सुद्धा हाल करत होते… या वाक्याचा वापर सिनेमात जिथे जिथे झालाय त्या त्या वेळी दाखवलेली दृश्ये खरंच भयानक आहेत…

    ४) अनुपम खेर म्हणजेच पुष्करनाथ पंडित यांनी सिनेमाभर जी batting केली आहे ती अप्रतिम आहे…एका सिन मध्ये जेव्हा आतंकवादी त्यांच्या मुलाला गोळ्या घालतात तेव्हा ते त्यांच्या डॉक्टर मित्राला कॉल करून सांगतात लवकर ऍम्ब्युलन्स घेऊन ये..तेव्हा मित्र म्हणतो “जहाँ गोली लगी है वहा पट्टी बांध लो..” त्यावर पुष्करनाथ बोलतात “कहा कहा पट्टी बांधू, घरमे तो उतने कपडे भी नहीं है जितनी गोलिया मारी है” हा सिन दाखवताना दहशतवादी विभागांतील जी दाहकता दिसते ती वर्णन करण्यापलीकडली आहे….

    ५) अतुल श्रीवास्तव यांचा पत्रकार विष्णू राम हा त्या पत्रकारांमधील आहे जो पाहतो तर सर्व… त्याला दाखवायचं आहे देखील सर्व सत्य पण सिस्टीम मुळे तो भरडला जातोय… आणि याच पत्रकाराचे एक वाक्य आहे “जब तक सच जुते पहनता है तब तक झूट पुरी दुनिया का चक्कर मारता है” या एका वाक्यात सत्य किती दाबले आहे आणि असत्य किती बेछूट आहे हे दिसून येते…

    ६) त्यासोबतच अजून दोन वाक्ये आहेत पुनीत इस्सर यांच्या DGP हरी नारायण आणि पल्लवी जोशी यांच्या राधिका मेनन यांची.. जेव्हा DGP बोलतात “बम मुझपे फटा था तुम पे नहीं .. और इसीलिये सरकार ने मुझे पदमश्री दिया है” यावर पत्रकार “आपको पदमश्री चूप रहने के लिये दिया है… मुह बंद रखने के लिये दिया है..” यातून केवळ गरीब जनतेचीच नाही तर सरकारी सेवेत असलेल्यांची सुद्धा कशी गळचेपी केली जाते हे कळते… आणि राधिका यांचे “सपने सच नहीं होते उनके पिछे भागना पडता है” वाक्य म्हणजे कहर होते…

    ७) शेवटचा कृष्णा पंडित याचा काश्मीर वरचा जो मोनोलॉग आहे ना… कहर आहे… मला क्रांतिवीर मधल्या नाना पाटेकर यांच्या “आ गये मेरी मौत का तमाशा देखने” सिन ची आठवण झाली… काश्मीर बद्दल बरीच माहिती… तळमळ.. आणि आग एकत्र बाहेर निघाली आहे…

    ८) चित्रपटाचा शेवट बिट्टाच्या (चिन्मय मांडलेकर) अतिक्रूर कारवायांवर संपतो… आपल्याला वाटत चित्रपट संपतो पण तो संपत नाहीच खरा… तो सुरूच राहतो.. आत खोल कुठे तरी तुमच्या मनात,,, तुमच्या डोक्यात… तुमच्या हृदयात…..कौतुक करायचे तर आधी विवेक अग्निहोत्री यांचे दिगदर्शक म्हणून… रील आणि रिअल या दोन्ही सिनचे जे मिश्रण केले आहे ते अप्रतिम… काश्मीरचे बरेच न दाखवले गेलेले कंगोरे यात दाखवले आहे… कुठेच मुस्लिम चुकीचे दाखवले नाहीत तर काश्मिरी पंडित आणि त्यांच्या परिवाराचा या सर्वात काय दोष आहे का हे प्रश्न दाखवले आहे.. त्यामुळे हा सिनेमा एकांगी नाही झाला…आता बोलूयात दोन्ही “समीर” विषयी म्हणजे दर्शन कुमार (मेजर समीर – family man) आणि चिन्मय मांडलेकर (समीर सय्यद – मोरया) आता तुम्ही म्हणाल हे काय मधेच.. तर या दोन्ही अभिनेत्यांची हि मला आवडलेली सर्वोत्तम पात्रे आणि यामुळेच मी त्यांचा चाहता झालो आणि आज या सिनेमात सुद्धा family man मध्ये कट्टर जिहादी आणि अतिरेकी मनाचा मेजर समीर साकारणारा हाच तो अभिनेता आहे का यावर विश्वास बसत नाही तर बिट्टा साकारणाऱ्या चिन्मय यांचा काश्मीर फाईल सोबतच एक सिनेमा अजूनही थेटर मध्ये धुमाकूळ घालतोय तो म्हणजे पावनखिंड ज्यात ह्याच व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज साकारले आहेत.. हे कसं शक्य आहे.. असं वाटावे इतका उत्तम अभिनय केलाय…मिथुन, अनुपम खेर, मृणाल कुलकर्णी, पल्लवी जोशी, पुनीत इस्सार, प्रकाश बेलवाडी, अतुल श्रीवास्तव यांच्याबद्दल आपण पामराने काय बोलावे पण या सर्व गर्दीत खास उल्लेख करावा वाटतो तो भाषा सुंबाली या अभिनेत्रीचा जिने अनुपान खेर यांच्या सुनेचे पात्र रंगवले आहे.. कमी वेळात पण अप्रतिम काम केले आहे..

    सिनेमाचा tone आणि कायम एक tens वातावरण ठेवणारे BGM उत्तम आहे…सिनेमा म्हणून याला मी ७/१० रेटिंग देऊ शकेन… कारण टेकनिकली अजून ब्रूटल आणि सुधारित होऊ शकला असता सिनेमा… Mouth Publisity काय करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा सिनेमा,,१५ कोटींच्या बजेट मध्ये बनलेल्या सिनेमाने आत्ता पर्यंत १२० कोटीहून अधिक कमाई केली आहे… .सिनेमा म्हणून तरी का होईना एकदा हा सिनेमा बघूच शकतो..बाकी आपापल्या आवडीवर आहे….

    आज काही इस्टर एग्ज तर नाही सांगणार पण दोन मजेशीर बाबी सांगतो… १) the silence of swastika नंतर हा दुसरा सिनेमा आहे ज्याला IMDb वर १०/१० रेटिंग दिली होती… परंतु IMDb च्या यावर्षीच्या नवीन policy अनुसार (कि भारतीय सिनेमाला hollywood समोर कमी लेखण्याचा विचार म्हणून) १०/१० रेटिंग म्हणजे एक bug error मानण्यात येतो आणि त्यामुळे IMDb आपणहून याची रेटिंग ठरवते जी सध्या ८.३/१० आहे

    २) या सिनेमातील मुख्य पात्र आहे कृष्णा पंडित तर या नावाचे संदर्भ आहेत… एक म्हणजे महान अभिनेते बेन किंग्जले यांचे खरे नाव कृष्णा पंडित आहे तर काही लिखित दस्तावेजांमध्ये कोलंबस याला भारतीय भूभाग दाखवणारे एक भारतीय उद्योगपती होते (ज्यांनी कोलंबसच्या भरकटलेल्या जहाजाला दिशा दाखवण्याचे काम केले) त्यांचे नाव होते “कृष्णाजी पंडित” (याचा सिनेमाशी काही संबंध नाही…. फक्त आठवले म्हणून सांगितले) .

    तूर्तास थांबतो…..

    इति – फिल्मीराजे…

    Latest Posts

    Don't Miss

    Stay in touch

    To be updated with all the latest news, offers and special announcements.