Wednesday, March 29, 2023
More

  Latest Posts

  Marathi Movie Circuit – मराठी चित्रपट सर्किट

  Marathi Movie Circuit रितेश देशमुख(Rithesh Deshmukh) आणि जेनेलिया(Jenelia) च्या वेड चित्रपटाने मराठी प्रेक्षकांना वेड लावले असतानाच, वैभव तत्ववादी(Vaibhav...

  Maharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज

  लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट आधारित आहे....

  OTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)

  नेटफ्लिक्स आणि इतर OTT प्लॅटफॉर्मवर येणार्‍या नवीन चित्रपट आणि वेब शोची यादी, जी रॉकेट बॉईज सीझन 2, कुट्टे ते पॉप कौन पर्यंत...

  200 Halla Ho Movie Review in Marathi – २०० हल्ला हो

  नागपूरच्या कस्तुरबानगर मधील जिल्हा कोर्टात अक्कू यादव नावाच्या एका आरोपीला आणले जाते. त्या दिवशी कोर्टात नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते आणि त्यातही स्त्रियांचे प्रमाण जास्त असते. अचानक या स्त्रिया घरातून आणलेल्या मिरची पावडर, सूरी या सारख्या वस्तुंनी अक्कू यादववर सर्वांसमोर कोर्टात हल्ला करतात आणि काही मिनिटात तेथून पळून जातात. आणि कोर्टात राहतो तो अक्कू यादवचा रक्तात पडलेला मृतदेह आणि मिरची पावडर..
  १३ ऑगस्ट २००४ ला घडलेल्या या सत्यघटनेवर आधारित २०० हल्ला हो हा चित्रपट झी५ या अँप वर प्रदर्शित झालाय.

  200 Halla ho Movie Review in Marathi

  200 Halla Ho Movie Review in Marathi

  200 Halla Ho चित्रपटाच्या सुरुवातीलाच एसीपी समीर देशपांडे (Indraneil Sengupta) काही कामानिमित्त कोर्टात येत असतात तेव्हाच हा प्रसंग घडतो. काय घडले हे पाहण्यासाठी एसीपी समीर जेव्हा कोर्टरूम मध्ये पोहचतात तेव्हा संपूर्ण रूम मध्ये मिरची पावडर पसरलेली दिसते, तर मानवी अवयवाचे तुकडे सर्वत्र पसरलेले असतात आणि रक्तात पडलेला एक मृतदेह. या गुन्ह्याची क्रूरता या प्रसंगातुन दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता यांनी दाखवली आहे.

  कोण असतात या महिला, एका आधीच अटक झालेल्या आणि कोर्टासमोर आलेल्या बल्ली चौधरी (Sahil Khattar) नामक आरोपीवर या का हल्ला करतात आणि एवढ्या क्रूरपणे त्याचा खून का करतात असे प्रश्न घेऊनच चित्रपटाची सुरुवात होते.
  पण या प्रश्नांची उत्तरे शोधण्यापेक्षा कोणी खून केला त्यांना शोधून लवकर हि केस बंद करण्याला पोलीस प्रशासन प्राधान्य देते, याचसाठी पोलीस निरीक्षक सुरेश पाटील (उपेंद्र लिमये) हे शहरातील राही या दलित झोपडपट्टीत पोहचतात आणि झोपडपट्टीतील सर्व महिलांना बोलावून त्यातील ५ महिलांना अटक करतात. याच वेळी रिंकू राजगुरू म्हणजेच आशा सुर्वेची एंट्री होते. आशा याच वस्तीत राहिलेली पण अनेक वर्षांनंतर शहरातून शिक्षण घेऊन आलेली असते. आशाला इतर महिला पोलिसांसमोर जाण्यापासून अडवतात.

  विरोधीपक्षाचा एक नेता महिला आयोगाच्या अध्यक्ष्याना पूर्णिमा (Flora Saini) यांना या प्रकरणाचा फायदा घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यास सांगतात. या ४ सदस्यीय समितीचे अध्यक्ष असतात निवृत्त न्यायाधीश विठ्ठल डांगळे(Amol Palekar). पुढे ही समिती या स्त्रियांना मदत करण्यात यशस्वी होते कि फक्त राजकारण्यांच्या स्वार्थासाठी बनवलेली समिती स्वार्थसाधून मध्येच बंद केली जाते. हे पाहण्यासाठी चित्रपट पहा.

  200 Halla ho Movie Review in Marathi

  200 Halla Ho चित्रपट हा एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे, मसाला चित्रपट आवडत असतील तर कदाचित हा चित्रपट तुम्हाला आवडणार नाही. पण एक उत्कृष्ट कलाकृती, चांगले अभिनय , चांगले संवाद आणि सत्यकथेवर आधारित वास्तव परिस्थिती अनुभवायची असेल तर हा चित्रपट तुम्हाला अजिबात निराश करणार नाही .

  DIAL 100 MOVIE REVIEW IN MARATHI- डायल १०० चित्रपट परीक्षण

  200 Halla Ho चित्रपटात असे अनेक संवाद आहेत जे ऐकून तुम्हाला ते पटतील आणि अस्वस्थ करतील. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी दीप मेटकरी यांनी उत्तम केली आहे. सर्व कलाकारांचे अभिनय उत्तम आहेतच. अमोल पालेकर यांनी विठ्ठल डांगळे हि व्यक्तिरेखा उत्कृष्ट साकारली आहे. या व्यक्तिरेखेचे दोन पैलू आपल्याला पाहायला मिळतात, मध्यंतरापूर्वी चे विठ्ठल डांगळे हे प्रतिकूल परिस्थितीतून प्रयत्न करून निवृत्त झालेले न्यायाधीश आणि मध्यंतरा नंतर वास्तवाची ओळख झालेले विठ्ठल डांगळे . रिकु राजगुरूने आशा ची व्यक्तिरेखा उत्तम साकारली आहे. सुषमा देशपांडे, वरूण सोबती, सलोनी बात्रा, उपेंद्र लिमये, विनय हाके, फ्लोरा सैनी, साहिल खट्टर सर्वांचे अभिनय उत्कुष्ट झालेत.

  STATE OF SIEGE MOVIE REVIEW IN MARATHI – स्टेट ऑफ सिज चित्रपट परीक्षण

  समाजातील वास्तव जाणून घ्यायचे असेल तर हा चित्रपट झी५ वर नक्कीच पहा.

  200 Halla ho Movie Review in Marathi
  • हलतीचित्रे.कॉम वर तुमचे लेख प्रकाशित करण्यासाठी आमच्याशी संपर्क करा. contact@haltichitre.com / message on WhatsApp

  Latest Posts

  Marathi Movie Circuit – मराठी चित्रपट सर्किट

  Marathi Movie Circuit रितेश देशमुख(Rithesh Deshmukh) आणि जेनेलिया(Jenelia) च्या वेड चित्रपटाने मराठी प्रेक्षकांना वेड लावले असतानाच, वैभव तत्ववादी(Vaibhav...

  Maharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर राज ठाकरेंच्या हस्ते रिलीज

  लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट आधारित आहे....

  OTT Releases – 17-March | या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेत, चुकवू नयेत असे चित्रपट आणि मालिका (१७ मार्च)

  नेटफ्लिक्स आणि इतर OTT प्लॅटफॉर्मवर येणार्‍या नवीन चित्रपट आणि वेब शोची यादी, जी रॉकेट बॉईज सीझन 2, कुट्टे ते पॉप कौन पर्यंत...

  Don't Miss

  नागपूरच्या कस्तुरबानगर मधील जिल्हा कोर्टात अक्कू यादव नावाच्या एका आरोपीला आणले जाते. त्या दिवशी कोर्टात नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते आणि त्यातही स्त्रियांचे...

  Dial 100 Movie Review in Marathi- डायल १०० चित्रपट परीक्षण

  डायल १०० चित्रपट परीक्षण Dial 100 Movie Review in Marathi रेन्सील...

  Stay in touch

  To be updated with all the latest news, offers and special announcements.