सान्या मल्होत्रा चा “पगलट” चित्रपट म्हणजे स्वतःला शोधण्याचा एक प्रवास आहे, नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
पगलट चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन उमेश बिस्ट यांनी केले आहे. चित्रपटात सान्या मल्होत्रा सोबतच श्रुती शर्मा, आशुतोष राणा, रघुबीर यादव, राजेश तेलंग आणि नकुल रोशन सहदेव हे महत्वाच्या भूमिकेत आहेत.
चित्रपटाची निर्मिती शोभा कपूर, गुनीत मोंगा, एकता कपूर आणि अचिन जैन यांनी बालाजी मोशन पिक्चर्स आणि सिख्या एंटरटेनमेंट या बॅनर खाली केली आहे.
पगलट चित्रपटामध्ये प्रथमच सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सान्या ने अमीर खान च्या दंगल चित्रपटामधून हलत्याचित्रांच्या दुनियेत प्रवेश केला. मागील वर्षी तिचा नवाझुद्दीन सिद्दीकी सोबतचा फोटोग्राफ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात देखील सान्या मुख्य भूमिकेत होती.
पगलट चित्रपटाच्या ट्रेलर वरून आपल्याला कथेची थोडी कल्पना येते,
ट्रेलरची सुरुवात सान्या म्हणजेच संध्या च्या लग्नापासून होते, पण लगेजच संध्याच्या पतीचा मृत्यू होतो. या नंतर सांध्याला धक्का बसला असेल असे तिच्या कुटुंबाला वाटत असते पण संध्या मध्ये कोणताच बदल नसतो, पुढे ती मैत्रिणीबरोबर पाणीपुरी खाताना सुद्धा दाखवली आहे. यापुढे येतो क्लायमॅक्स, जेव्हा संपूर्ण कुटुंबाला समजते संध्याच्या पतीने (अतिक गिरी) याने मरणापूर्वी ५० लाखाचा विमा घेतला होता आणि त्या विम्याची वारस संध्या असते. मग संध्याचे सासरची मंडळी तिचे लग्न अतीतच्या लहान भावाशी लावायचे ठरवतात जेणेकरून पैसे घरातच राहतील. इथून सुरु होतो संध्याचा स्वतःला शोधायचा प्रवास.
इथे एक वाक्य येते
“जब लडकी लोग को अकल आती है ना, सब उनको पगलट हि केहते है”
असा हा पगलट चित्रपट नेटफ्लिक्स वर २६ मार्च ला प्रदर्शित होत आहे.