Wednesday, January 31, 2024
More

    Latest Posts

    Dial 100 Movie Review in Marathi- डायल १०० चित्रपट परीक्षण

    डायल १०० चित्रपट परीक्षण

    Dial 100 movie review in Marathi

    Dial 100 Movie Review in Marathi

    रेन्सील डीसिल्वा दिग्दर्शित डायल १०० (Dial 100 Movie) चित्रपट ६ ऑगस्ट २०२१ ला झी५ वर प्रदर्शित झाला. चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स ने केली आहे. चित्रपटात मनोज बाजपेयी, नीना गुप्ता आणि साक्षी तन्वर मुख्य भूमिकेत आहेत.

    डायल १०० हा गुन्ह्यावर आधारित थरारक चित्रपट आहे. मनोज बाजपेयी हे या चित्रपटात पोलीस कंट्रोल रूम मधील सिनिअर पोलीस इन्स्पेक्टर निखिल सूद या भूमिकेत आहेत.
    चित्रपटाची सुरुवात पावसाळ्यातील रात्रीपासून होते, जेव्हा निखिल कंट्रोल रूम मध्ये पोहचतो. काही वेळातच कंट्रोल रूम मध्ये एका स्रीचा फोन येतो, तिच्या बोलण्यावरून ती आत्महत्या करायच्या विचारात आहे असे जाणवते, तिचा फोन निखिलकडे ट्रान्स्फर केला जातो. त्या स्त्रीच्या आवाजावरूनच आपण ओळखू शकतो हा आवाज नीना गुप्ता यांचा आहे.

    निखिल म्हणजेच मनोज बाजपेयी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांनी आत्महत्येचा विचार सोडून द्यावा. अश्यातच निखिलच्या लक्षात येते कि हि स्त्री गाडी चालवत आहे आणि सोबतच दारू सुद्धा पित आहे. निखिल तिला गाडी बाजूला लावून बोलण्याचा सल्ला देतो, पण एवढ्यातच अपघाताचा आवाज येऊन कॉल कट होतो. याच वेळी साक्षी तन्वर म्हणजेच निखिलची पत्नी, निखिलला फोन करून त्यांच्या मुलाविषयी तिच्या मनातील चिंता सांगते.

    200 HALLA HO MOVIE REVIEW IN MARATHI – २०० हल्ला हो

    या कॉलच्या विचारात असतानाच पोलीस कंट्रोल रूममध्ये पुन्हा त्याच महिलेचा आवाज येतो. आणि पुन्हा दोघांमधील संभाषण सुरु होते. नीना गुप्ता या फक्त त्यांच्या आवाजाने आपल्याला गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत तर मनोज बाजपेयी यांचा नैसर्गिक अभिनय फोनवरील संभाषण अजिबात कंटाळवाणे होऊन देत नाही.

    Dial 100 movie review in Marathi

    नीना गुप्ता जेव्हा पहिल्यांदा समोर येतात तेव्हा सुद्धा एक वेगळीच छाप पडते. साक्षी तन्वर चा अभिनय उत्तम झालाय. पण इतर कलाकारांना चित्रपटात जास्त काही संधी नाही. काही पात्रांना तर मध्येच सोडल्या सारखे वाटते.

    पुढे जाऊन निखिलला समजते त्याचा परिवार धोक्यात आहे. सतत येणारा कॉल आणि संकटात परिवार याचा काही संबंध आहे का? निखिल आपल्या परिवाराचे रक्षण करू शकतो का? नीना गुप्ता आणि मनोज बाजपेयी एकमेकांच्या समोर येतात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी १तास ४४ मिनिटांचा डायल १००(Dial 100 Movie) हा चित्रपट पहावा लागेल.

    STATE OF SIEGE MOVIE REVIEW IN MARATHI – स्टेट ऑफ सिज

    Dial 100 चित्रपटात कोण हिरो आणि कोण व्हिलन हे आपणच ठरवायचे आहे. चित्रपटाची कथा तशी नेहमीचीच आहे. अनेकदा पुढे काय होणार आहे हे आपल्याला आधीच लक्षात येते. चित्रपटाचा शेवट थोडा वेगळा वाटतो. सगळ्यात शेवटी जो संदेश हा चित्रपट देतो किंवा जो प्रश्न उपस्थित करतो तो खूप महत्वाचा आहे .

    लहानपणी आपण एखादा खेळ खेळायचो तेव्हा एकावर राज्य यायचे तेव्हा तो इतरांना पकडायचा प्रयत्न करतो आणि एकदा दुसऱ्या कोणाला पकडले कि तो मुक्त होतो आणि जो आधी मुक्त होता त्याच्यावर राज्य आलेले असते. म्हणजेच तेव्हा त्याला पहिल्याच्या मनस्थितीची जाणीव होते. असेच काहीतरी ..

    नसेल समजले तर सोडून द्या, खूप कमी बजेट मध्ये बनलेला डायल १०० (Dial 100) हा उत्तम चित्रपट पहा, मनोरंजन नक्कीच होईल.

    आमचा हा Dial 100 Movie Review in Marathi आपल्याला कसा वाटला हे खाली कॉमेंट करून कळवा.

    • हलतीचित्रे.कॉम वर तुमचे लेख प्रकाशित करण्यासाठी आमच्याशी संपर्क करा. contact@haltichitre.com / message on WhatsApp

    Latest Posts

    Don't Miss

    Stay in touch

    To be updated with all the latest news, offers and special announcements.