स्टेट ऑफ सिज
State of Siege Movie Review in Marathi
२००२ मध्ये गुजरात मधील अक्षरधाम मंदिरावर झालेल्या आतंकवादी हल्ल्यावर आधारित स्टेट ऑफ सिज(State of Siege) चित्रपट नुकताच झी ५ वर प्रदर्शित झालाय.
State of Siege चित्रपटात अक्षय खन्ना मेजर हनूत सिंघ या मुख्य भूमिकेत आहे तर गौतम रोडे, मंजिरी फडणीस, अभिमन्यू सिंग, अक्षय ओबेरॉय,अमीर सोनी हे महत्वाच्या भूमिकेत आहेत. अभिमन्यू सिंघ यांनी अबू हमझा या निगेटिव्ह भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन केन घोष यांनी केले आहे.
State of Siege चित्रपट जवळ जवळ २ तास लांबीचा आहे, पण हे दोन तास चित्रपट तुमचे पूर्ण मनोरंजन करतो. चित्रपटाची गोष्ट गुजरातमधील एका भव्य मंदिरापासून सुरु होते. या मंदिरात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक भेट देत असतात. अश्यातच सीमेपलीकडे मंदिरावर हल्ल्याचा कट शिजत असतो. बिलाल नायकू या भारतीय कैदेत असलेल्या आतंकवाद्याला सोडवण्यासाठी अबू हमझा या मंदिरावर हल्ल्याचा कट रचतो आणि ठरलेल्या कटा प्रमाणे ४ पाकिस्थानी आतंकवादी मंदिरावर हल्ला करतात आणि अनेकांचे प्राण घेतात तर अनेकांना बंदी बनवतात. अक्षय खन्ना म्हणजेच मेजर हनूत सिंघ हे NSG चे मेजर मंदिरात शिरून बंदीत असलेल्यांना सोडवतात.
एवढी कथा आपण चित्रपटाच्या ट्रेलर वरून पण समजू शकतो किंवा अक्षरधाम मंदिरावर झालेला हल्ला तर आपल्याला माहीतच आहे. पण या मध्ये जे काही घडते ते महत्वाचे आहे. मेजर हनूत सिंग याची या हल्ल्याच्या वेळेची मनस्थिती , मनातील युद्ध आणि बाहेर सुरु असलेले युद्ध यामध्ये मेजर हनूत सिंग अडकलाय. चित्रपटात दिग्दर्शकांनी भीती उत्कृष्ट पद्धतीने दाखवलीये, अक्षय खन्नाचा अभिनय उत्तमच आहे. चित्रपटात मंदिरात घुसलेले आतंकवाद्याच्या तोंडी जे संवाद आहेत ते खूपच साधारण आहेत काही ठिकाणी तर विनोदी वाटतात, त्यामुळे चित्रपट पाहताना तुम्हाला त्यांचा राग कमी येतो.
DIAL 100 MOVIE REVIEW IN MARATHI- डायल १०० चित्रपट परीक्षण
State of Siege चित्रपटात अनेक छोटे छोटे तपशील नाही आहेत. चित्रपटाची तुलना उरी सारख्या चित्रपटाशी कराल तर हा खूपच सामान्य चित्रपट वाटेल.
तरीही एकदा हा चित्रपट नक्कीच पाहू शकता, १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला टीव्ही वर लागणाऱ्या चित्रपटांमध्ये अजून एक चित्रपट सामील झाला आहे.
तुम्ही हा State of Siege चित्रपट झी५ या अँप वर पाहू शकता किंवा १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीच्या वाट बघू शकता.
200 HALLA HO MOVIE REVIEW IN MARATHI – २०० हल्ला हो
आमचा हा State of Siege Movie Review in Marathi आपल्याला कसा वाटला हे खाली कॉमेंट करून कळवा.
- हलतीचित्रे.कॉम वर तुमचे लेख प्रकाशित करण्यासाठी आमच्याशी संपर्क करा. contact@haltichitre.com / message on WhatsApp